जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

 The formula of life

The formula of life : रोबोट सारखं सतत राबूनही मनासारखं घडत नाही. जीवनात यश मिळते की नाही, हाच विचार कायमचा धुडगूस घालतोय. सुवर्णाक्षणाच्या नेनिवेन वर्तमानाला हायस केलय. पण वर्षाच्या वर्ष उलटत असूनही आपण मात्र होतो तिथेच आहोत. नजरेसमोर केवळ काळोख दिसतोय. अंध:कारणं हृदय धडधडतय. अशावेळी मनातल्या विचारांच्या गोंधळाला बाजूला सारून पॉज घ्यायलाच हवा. कोण जाणे उत्तर काळाच्या उदरात दडलेले असतील. काही प्रश्नांवर वेळ हाच उपास अस. जीवनात असे प्रसंग येतात जे सोडवण्याची क्षमता आपल्यात नसते. ज्या गोष्टी मनुष्याच्या नियंत्रणाबाहेर असतात त्यावर कथ्थ्या कूट करण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. याचा अर्थ, तुम्ही स्वस्थ बसावं असा होत नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की, सर्व मार्ग बंद झालेत, खरं तर, तेव्हाच तुमच्या उज्वल भविष्यासाठी अनेक मार्ग खुलायला लागलेले असतात. प्रत्यक्षात ते आपल्या सामान्य नजरेने दिसत नाहीत. अस्वस्थ आणि गोंधळलेल मन तर तिकडे लक्ष देऊ शकत नाही. अशावेळी शांततेचा पॉज गरजेचा असतो. सर्वप्रथम अंतर्मनाला शांत करणे गरजेचे असतं आणि ते पॉज घेतल्याशिवाय शक्य नसतं. बाहेरचं जग तसंच दिसतं जसं आंतरिक मन असतं. तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवला की, इतर बाबीही मिळवता येतील. त्यासाठी काही वेळ जाऊ देन गरजेचं असतं. त्यानंतर तुम्ही ज्याही कामाला सुरुवात करतात ते अधिक क्षमतेने आणि अचूकतेने पार पाडता येऊ शकतात. काम करत राहणं हेच आपलं बिद्र असावं, परंतु ते योग्य दिशेने असावं. कधी कधी आपला रस्ता चुकतो. गोंधळलेल्या अवस्थेत तिथेच भरकटत राहून ऊर्जा गमवण्यापेक्षा पॉज महत्त्वाचा ठरतो. याचा उपयोग पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी आणि विचारपूर्वक योग्य दिशेने मार्गक्रमण करण्याची योजना आखण्यासाठी होतो. अर्थात यासाठी तुमचं अवचेतन मन तुम्हाला गाईड करत. परंतु ते तेव्हाच तुम्हाला कळतं जेव्हा चेतन म्हणाला तुम्ही पॉज घेऊन शांत करता. अनेकदा बिकेत परिस्थितीत चेतन मन तुम्हाला तशाच प्रकारच्या अनेक कपल कलीप्त घटना तुमच्यासमोर मांडून तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी केलेली घाई नेहमीच दरीत कोसळते. क्षणात होत्याचं नव्हतं करते म्हणून पॉज आवश्यक असतो.



पृथ्वीतलावर जन्मला कोण मनुष्य असा आहे ज्याला कधीच दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले नसेल? असा कोण आहे ज्याच्या समोर बिकट प्रसंग आलेच नसतील? असा कोण आहे ज्याला असहय्य वाटलं नसेल? असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येत असतात, परंतु काही जण अशा प्रसंगातून सुखरूप बाहेर पडतात आणि बहुतांश परिस्थितीला दोष देत तिथेच राहतात. जे बाहेर पडतात ते त्यांनी स्वीकारलेल्या सकारात्मकतेमुळे आणि त्याच्या अवचितनाच्या मार्गदर्शनामुळे. जे तिथेच थांबतात ते चेतन मनाच्या गुंतळ्यात अडकून पडल्यामुळे. प्रसंग बाकाला म्हणून घाबरून जाऊन त्याच्या भविष्यातल्या भयावह परिणामाचा चित्र नेहमी नेहमी डोळ्यासमोर उभे करून खरं तर तुम्ही तशाच प्रसंगांना आमंत्रित करीत असतात. घटना घडली तो भूतकाळ असतो त्या घटनेच्या भविष्यातल्या परिणामाचा विचार करून जे लोक वर्तमानाचा सुद्धा काडीकचरा करतात ते त्यांना नको असलेल्या भविष्याचेच निर्मिती करत असतात. अर्थात हे सर्व अनवधान होत असतं. परंतु आपण कायमचंच सकारात्मक असावं आणि कायम तसेच विचार मनात येऊ द्यायचे हे आपल्याला कळत नसतं असं नव्हे. हे सर्व कळत असूनही आपणच आपल्या विचारांवर अविश्वास दाखवतो. खरंच विचार अस्तित्वात येत असतात का? असा प्रश्न स्वतःला विचारतो. प्रश्न विचारण्याचा कल अविश्वास जगवणारा हताशजनक असतो. याच विचारांना थांबवण्यासाठी पॉज आवश्यक असतो. आपल्या जीवनात थोडं डोकावून पहा. जे प्रश्न सोडवण्यात जाऊ शकत नाही अशा कठीण प्रसंगातून मरेपर्यंत आपली सुटका नाही, असं तुम्हाला वाटत होतं. त्यापैकी किती प्रश्न आज अस्तित्वात आहेत!

बरेच प्रश्न वेळेनुसार सुटलेले असतात. तुम्हाला भीती वाटत होती अशा अनेक घटना तुमच्या जीवनात घडल्याच नाहीत. ज्यांची परिस्थिती जैसे अशी आहे त्याला दुसरं तिसरं कोण कारणीभूत असणार! जसा आपण चांगल्या घटनांचा स्वीकार करतो, आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता, याचं बखान सर्वांसमोर करतो. तसंच आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक घटनांचा ही आपण स्वीकार करायला हवा. स्वीकारता हा गुण त्या घटनांची तीव्रता कमी करण्याचे काम करतो. अस्विकार करण्याची पद्धती रोशाला जन्माला घालते. ज्यातून राग, द्वेष, तणाव आदींची निर्मिती होते. हे टाळण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतात, असं बिलकुलच नसतं. बस प्रेमाचा पॉज घेणं तेवढंच गरजेचं असतं. अंतर्मन प्रेमाने भरून टाकणारा कधीच अर्धा प्याला खाली आहे की अर्धा प्याला भरलेला आहे, याचा विचार करत नाही. कारण, त्याला त्याची गरजच पडत नाही. ज्याच्याकडे प्यायलाच नाही त्याच्यापेक्षा आपल्याकडे प्याला असणच त्याच्यासाठी समाधान देणारे ठरतं. थोडक्यात मनाला कोणत्याही परिस्थितीत समाधानी ठेवता येत. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या विचारांना योग्य दिशा देण्याची गरज असते. प्रश्न आहेत तर उत्तर आहे च. कच्चा रस्त्यांना भरधाव वेगाने गाडी गेली, धुराळा उडला म्हणून रस्ता दिसत नाही, रस्ता दिसत नाही, असं ओढत राहिल्याने रस्ता थोडीच दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला धुरळा खाली बसेपर्यंत पॉज घ्यावा लागेल. थोड्याच वेळेत धुरळा खाली बसेल आणि तुम्हाला पुन्हा स्पष्ट दिसायला लागेल. जीवनात तरी यापेक्षा वेगळं काय असतं? बस, तुम्हाला केव्हा, आणि कोणत्या वेळी पॉज घ्यायला हवा एवढेच कळायला हवं, तेवढं कळलं की बघा बरं जीवनात कसे अगदी मनासारखे जगण्याचे मार्ग मिळायला लागतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित