स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार.....

स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार..... | Swami Narayan Temple, Nashik स्वामी नारायण मंदिर, नाशिक अतिशय सुंदर असे आहे. मंदिरातील शिल्पांमध्ये भक्तांना होणार आहे भारतीय संस्कृतीचे दर्शन. नाशिक शहराला ऐतहासिक व पारंपारिक शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहरामध्ये अनेक मंदिर आहेत. या मंदिराचे नाव बीएएस स्वामी नारायण मंदिर म्हणून ओळखले जाते. स्वामी नारायण मंदिर, नाशिक : Nashik : स्वामी नारायण मंदिर हे सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. तसेच या मंदिरात सर्व देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे ह्या मंदिरात सर्वच धर्मातील बांधव येत असतात. स्वामी नारायण मंदिर हे १४० फुट लांब, ५५ फुट रुंद, व ७८ फुट उंच असे मंदिर आहे. तसेच या मंदिरात ८० हजार घनफूट गुलाबी व १५ हजार घनफूट लाल दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावरील नक्षीकाम हे अतिशय बारकाईने केले आहे. हे नक्षी काम हे सुबक आणि आकर्षक आहे. तसेच मंदिराचे स्तंभ, कमान हि कोरीव आहेत. नाशिक शहर हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन होण्यासाठी स्तंभावर अनेक प्रकारच्या कलशांचे नक्षी काम करण्या