जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

dhanteras धनत्रयोदशी दिवशी धने का खरेदी करावे ? धनत्रयोदशी दिवशी धने का खरेदी करावे ? ऑक्टोम्बर ला सणांचा महिना म्हणून ओळखले जाते. सगळ्यात जास्त ह्या महिन्यात सण असतात. दसरा, धनत्रयोदशी दिवाळी तसेच भाऊबीज असे मोठे सण असतात. अश्या सणांमुळे घरे उजळून येतात. या वेळेस म्हणजेच २०२२ साली धनत्रयोदशी चा सण २३ ऑक्टोम्बर रोजी आला आहे. धनत्रयोदशी च्या दिवशी लोक नवनवीन भांडी तसेच सोन्या चांदीचे दागिने खरेदी करतात.
धनत्रयोदशी च्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे म्हणजे शुभ happy dhanteras मानले जाते. त्यामुळेच महाराष्ट्रात यावेळेस बाजारपेठत खरेदी करणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. तसेच धनत्रयोदशी दिवशी धने देखील खरेदी करणे शुभ मानले जाते.
या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी व्ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा फोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा १ माळ जप करावी. फुलांचा हार घालावा, तुलसी वाहावी, नैवेध्य दाखवावा. धन्वंतरीच्या उपासनेबरोबर घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे. दीर्घायुष्य व आरोग्यासाठी प्रार्थना करावी. तसेच प्रत्येक हॉस्पिटल मध्ये धन्वंतरी चे पूजन केले जाते. यामुळे बरीच प्रगती होते. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते.
तसेच आता आपण बगणार आहोंत धनत्रयोदशी dhantrayodashi दिवशी धने का खरेदी करतात ते...?
धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करणे फार शुभ मानले जाते. असे म्हणतात कि, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धने हे खूप चांगले आहे. या कारणामुळे बाकी खरेदी सोबतच लोक धने देखील खरेदी करतात. शहरांमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सुके धने खरेदी करतात. तसेच गावांमध्ये गुळ व धने याला एकत्र करून नैवेद्य बनवतात. धनत्रयोदशी च नाहीतर लक्ष्मी पूजनाला देखील धने देवी आईच्या चरणी ठेवतात.
पूजेनंतर धने तिजोरीत ठेवा dhanteras puja....
लक्ष्मी आईला प्रसन्न करण्यासोबतच आर्थिक परिस्तिथी सुधारण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करणे देखील चांगले मानले जाते. पूजेच्या वेळी देवी लक्ष्मी आईला धने अर्पण अकरा आणि पूजेनंतर ते धने तिजोरीत ठेवा. अश्या करण्याला शुभ मानले जाते तसेच भरभराट होते.
या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ काम करू शकतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा