जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

दंतशूलावर : आघाड्याचा रस लावावा.
कर्णनादावर : आघाड्याचे पाणी व आघाड्याचा कल्क यात तिळाचे तेल सिद्ध करावे व ते कानात टाकावे कर्ननाद व बहिरेपणा जातो.
रातांधळेपणा : भोजनानंतर रात्री आघाड्याच्या मुळ्या सुमारे एक तोळा खाण्यास द्यावे व झोपावे. हा उपाय ३ दिवस करावा.
पित्तावर : आघाड्याचे बी, रात्री ताकात भिजत घालून सकाळी प्यावे, म्हणजे पित्त पडेल. उपचार सुरु असताना तूप भात खावा.
पोटदुखी : आघाड्याची चार-पाच पाने चावून खावी अथवा पानांचा रस घ्यावा.
खोकल्यावर : आघाड्याचे चूर्ण व मिरी एकत्र करून मधात चाटण करून खावे.
मोडशीवर : आघाड्याचे मूळ पाण्यात उगाळून प्यावे.
कामीन रोगावर : आघाड्याची मुळी ताकत उगाळून प्यावे.
कुत्र्याच्या विषावर : आघाड्याची १ तोळा मुळी घेऊन मध सोबत घ्यावी. कोरफडीचे पण व सैंधव दंशावर बांधले म्हणजे ४ दिवसात विष उतरते.
कफज्वरावर : आघाड्याच्या पंचागाचा काढा मधासह घ्यावा.
कुक्षीशूळावर : एरंडमुळाच्या काढ्यात जवखार घालून द्यावा. म्हणजे कुक्षीशूल, कफशुल, छातीतील व पाठीतील शुल हे बरे होतात.
रेच होण्यास : एरंडेल २ तोळा गरम पाण्यातून किंवा सुंठीच्या अथवा त्रिफळाच्या काढ्यातून द्यावे.
अंगातील उष्णतेवर : हे तेल टाळूवर चोळावे म्हणजे मस्तकातील उष्णता निघून डोळ्यास तेज येते. हातापायाचा दाह व नाट्यासारखे चट्टे झाल्यास एरंडेल तेल थंड पाण्यात घालून चोळावे.
रक्तपितीवर : अडुळसा, गुळवेल यांचा काढा करून त्यात एरंडेल घालून घ्यावा.
पोटातील वायू : सुंठीच्या काढ्यातून एरंडेल द्यावे.
दम्यावर : एरंडेल, मधात मिश्रण करून ठेवावे व सकाळ-संध्याकाळ एक चमचा या प्रमाणात घ्यावे.
व्रनावर : दररोज निंबाचा पाला पाण्यात चांगला उकळून त्या पाण्याने व्रन स्वछ करावेत.
खरजेवर : हा पाला जाळून गोड्या तेलांत किंवा करंजेल तेलात खालून लावावा.
पित्त पडण्यास : कडुनिंबाच्या पाल्याच्या रसात पाणी टाकून प्यावयास द्यावा.
उष्णतेवर : कडुनिंबाच्या पाल्याचा रस खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ ८ दिवस सेवन करावा.
दाहयुक्त सुजेवर : कडुनिंबाची पाने वाटून लावावी म्हणजे दाह कमी होतो व रक्तदोष नाहीसा होतो.
कृमींवर : कडुनिंबाची पाने हिंगाबरोबर खावी.
जुलाब बंद होण्यास : कडुनिंबाचा पाला वाटून त्यात खडीसाखर घालून सरबत करून प्यावे.
मूळव्याधीवर : कडुनिंबाची २१ पाने बारीक वाटून, सोलीव मुगाच्या वाटलेल्या दलित मिश्र करून त्याचे वडे गायीच्या तुपात तळून २१ दिवस खावे. उपचार काळात सैंधव मीठ खावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा