जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

आपण झोपण्यापूर्वी लिंबू मधात मिसळून प्यायल्याने घसा शांत होऊन शांत झोप लागते.
रात्री झोपताना अचानक खोकला सुरू झाला की , आपली झोप मोड होते. त्यामुळे आपली चीड चीड देखील होऊ शकते. झोपताना अचानक येणारा खोकला हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. रात्रीचा खोकला हा दमा, ब्रॉंकायटीस किंवा श्वासोच्छवासाच्या संसर्गासारख्या शवसनाच्या आजारांचे लक्षन असू शकते.
जर तुम्हाला ऍसिडिटी सारखी पचनाची समस्या असेल तर यामुळे तुम्हाला रात्री खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तसेच वातावरणात असलेली धुळ, गादीचे माईट्स, बुरशी अश्या ऍलर्जी होणाऱ्या गोष्टी देखील खोकला वाढण्यास कारणीभूत असतात. जर का खोकला रात्रीच्या वेळी सारखा येत असेल आणि जर यो स्वतः थांबत नसेल तर खोकला कमी करण्यासाठी तुम्हाला डाक्टर कडे जाणे आवश्यक आहे. जर जाणे शक्य नसल्यास काही घरगुती उपाय करून पाहा.
कोमट मिठाचे पाणी :
N I H यांच्या मते घसा खवखवणे किंवा खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी कोमट मीठ पाण्याच्या गुळण्या करणे फायदेशीर ठरेल. असे केल्याने घश्यातील दूषित कण व रोगजंतूंना बाही काढण्यात मदत होते. त्यामुळे जर रात्री खोकला येत असेल ते कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
कडू बडीशेप, बडीशेप, पेपरमेन्ट, निलगिरी या वनस्पतीपासून तयार केलेले तेल खोकला कमी करण्यासाठी खूप फायदेशीर होते. रोज रात्री झोपण्या आगोदर पाण्यात निलगिरी किंवा पेपरमेन्ट चे 5/6 थेंब टाकून वाफ घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.
नेती पॉट :
हा एक योग्य आधारित उपचार आहे आणि योगाच्या सहा शुद्धीकरण तंत्रांपैकी एक शतकर्म आहे. यासाठी नेती पॉट वापरला जातो. ते कोमट खारट पाण्याने भरले जाते व एका नाकपुडीतून घातले जाते आणि दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढले जाते.
मध व लिंबाचे सेवन :
झोपण्यापूर्वी मधात लिंबू मिसळून पिल्याने घशाला आराम मिळतो व चीड चीड कमी होते. पण लिंबू मध लहान मुलांना देऊ नये. हे खोकल्यावरील औषधा सारखेच मानले जाते.
आल्ह्याचे सेवन :
आलं कोरडा व दम्याचा खोकला कमी करू शकते. कारण त्यात दाहक विरोधक गुण असतात. वेदना व मळमळ कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होतो. आलं चहात देखील वापरले जाऊ शकते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा