Two Wheeler गाडी च्या चावी सोबत येणारी छोटी अल्युमिनयम चीप जपून ठेवा.....

Two Wheeler गाडी च्या

चावी सोबत येणारी

छोटी अल्युमिनयम चीप जपून

ठेवा.....


Two Wheeler Key : आपण नवीन two wheeler घेतली की, त्यासोबत मिळणाऱ्या  key 🗝️ एक छोटीशी अल्युमिनयम ची चीप असते. त्यावर एक ५ अंकी आकडे कोड असतो. ती चीप नेमकी कशासाठी असते ??? हा प्रश्न कधी पडला आहे का..? 


इतकी छोटीशी दिसणारी ही चीप फार महत्वाची आहे. म्हणून ती जपणे आवश्यक आहे. त्यावरच नंबर हा किल्ली बनवताना जे गाळे बनवतात त्यातील असलेल्या फरकांमुळेच एक किल्ली दुसऱ्या लॉक ला लागत नसते. त्यावरचा आकडे कोड हा किल्लीचा अनुक्रमांक असतो. 

चीप जपून ठेवण्याचं कारण ....

गाड्यांसाठी कुलूप आणि किल्ल्यांची संख्या खूप आहे. पण प्रत्येक सेट हा गाडीच्या सुरक्षतेसाठी वेग वेगळा असतो. यासाठी कॉम्प्युटर च वापर करून त्याला आकडे कोड दिलेला असतो. जर का तुमची किल्ली हरवली कुठे तर ती तुम्हाला त्या क्रमांकावरून नवीन किल्ली बनवता येऊ शकते म्हणून ती चीप जपून ठेवणे महत्वाचे आहे.
 

क्रमांकावर बोलायचं झाल तर ...

क्रमांक हा किती ही क्रमांकाचा असू शकतो. उदाहरण द्यायचं झालच तर, पाच आकडी क्रमांकाचे साधारण ८०/८५ हजार कॉम्बिनेशन असू शकतात. असे करत ते वाढत जात साधारण हे आकडे क्रमांक ८ लाख पर्यंत जाते. आणि तिथून परत पुन्हा आकडे चालू होतात.

बारकोड नवीन सिस्टीम.....

आता सद्या किली सोबत चीप देण्याऐवजी बारकोड सिस्टीम आली आहे ती दिली जाते. हाच बारकोड आता स्कॅन केल्यावर त्याची सगळी माहिती मिळून जाते. हा एक बारकोड कंपनी मद्ये असतो आणि एक आपल्या बिलावर असतो. टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली विजेता कोल्हापूरची महिला, 'कौन बनेगा करोड़पति'

पृथ्वीवरच अवतरणार चंद्र! जेव्हा, आराम करा अन राहा.....

कॉमेडी चा राजा (King) राजू श्रीवास्तव यांचे दुःखद निधन