जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

कॉमेडी चा राजा (King) राजू
श्रीवास्तव यांचे दुःखद निधन
हास्य कलाकार (कॉमेडियन) (Raju Srivastava passes away)
झाले आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
खरतर गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्बेत बिघडली होतो. १०
ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ते व्यायाम करत असताना ते ट्रेंड मिलवर
पडले. यावेळी त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
एम्स हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले
होते. त्यांच्यावर अन्जिओप्लास्टी हि शाश्त्रक्रिया पार पडली. राजू
श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी कलेने प्रेक्षकांची मन जिंकली होती.
आता त्यांच्या निधनानं
मनोरंजन सृष्टीमध्ये शोकाकोळ पसरला आहे.
चित्रपट तसेच मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदी कलेने नेहमीच प्रेक्षकांची मन
जिंकली आहेत. तसेच ते 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोमधून ते
प्रेक्षकांच्या भेटीस आले. 'द किंग ऑफ कॉमेडी' असही राजू श्रीवास्तव
याना म्हणलं जात असे.
'मैने प्यार किया' व 'बाजीगर' या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी
काम केले आहे.
'बिग बॉस ३', 'नच बलिये', आणि कॉमेडी नाईट्स विद कपिलं' या
शोमध्ये राजू श्रीवास्तव यांनी सहभाग घेतला होता. राजू यांचे चाहते
भरपूर आहेत.
कित्येक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा