जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

याची काहीच कल्पना नसेल आपल्याला. पण आज आपण पृथ्वीवर किती एकूण मुंग्या आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.
Hong Kong हाँगकाँग Special administrative regions of China : आकाशातील तारे कोणी मोजू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण पृथ्वीवरील काही प्रजातींचे जीवही मोजू शकणार नाही, असेच आपल्याला वाटू शकेल.
याबाबत अकबर - बिरबलाची एक छोटीशी गोष्ट देखील आहे. शहरात किती कावळे आहेत, हे सांगत असताना चतुर बिरबल ने एक आकडा सांगितला होता. यामध्ये कमी कावळे भरले, तर ते दुसऱ्या शहरात पाहुणे म्हणून गेले असतील व जास्त भरले तर दुसऱ्या गावातील पाहुणे आपल्या शहरात आले असतील, असा त्यांचा युक्तिवाद होता. यामधील विनोद व चातुऱ्यचा भाग सोडला, तर हा प्रकार किती कठीण आहे, हे आपल्याला समजू शकते, तरीही हाँगकाँग मधील एका विद्यापीठाच्या संशोधकांनी पृथ्वीवरील मुंग्यांची एकूण संख्या सांगितली आहे.
![]() |
२०,००,००,००,००,००,००,००,००० इतक्या मुंग्या आहेत. (हुश्श!). नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेज जर्नल क्या पियर - रिव्ह्यू प्रोसिदिंगजमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
त्यानुसार वैज्ञानिकांनी जगभरातील सुमारे ५०० मुंग्या समुहांच्या अध्ययनाच्या विश्लेषणानंतर हा आकडा नक्की काय तो ठरला.
वर्ल्ड बँकनुसार पृथ्वीवर मानवी लोकसंख्या ७.८ अब्ज आहे आणि पृथ्वीवर मुंग्यांची संख्या जवळजवळ प्रतिव्यक्ती २.५ दशलक्ष इतकी आहे. हा आकडा मुंग्यांच्या यापूर्वीच्या वैशिवक लोकसंख्येच्या अनुमाना पेक्षा विसपट अधिक आहे.
जगभरात मुंग्यांच्या १६,७०० प्रजाती - उपप्रजाती आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा