स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार.....

इमेज
स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार..... | Swami Narayan Temple, Nashik स्वामी नारायण मंदिर, नाशिक अतिशय सुंदर असे आहे. मंदिरातील शिल्पांमध्ये भक्तांना होणार आहे भारतीय संस्कृतीचे दर्शन. नाशिक शहराला ऐतहासिक व पारंपारिक शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहरामध्ये अनेक मंदिर आहेत. या मंदिराचे नाव बीएएस स्वामी नारायण मंदिर म्हणून ओळखले जाते.  स्वामी नारायण मंदिर, नाशिक :  Nashik : स्वामी नारायण मंदिर हे सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. तसेच या मंदिरात सर्व देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे ह्या मंदिरात सर्वच धर्मातील बांधव येत असतात. स्वामी नारायण मंदिर हे १४० फुट लांब, ५५ फुट रुंद, व ७८ फुट उंच असे मंदिर आहे. तसेच या मंदिरात ८० हजार घनफूट गुलाबी व १५ हजार घनफूट लाल दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावरील नक्षीकाम हे अतिशय बारकाईने केले आहे. हे नक्षी काम हे सुबक आणि आकर्षक आहे. तसेच मंदिराचे स्तंभ, कमान हि कोरीव आहेत. नाशिक शहर हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन होण्यासाठी स्तंभावर अनेक प्रकारच्या कलशांचे नक्षी काम करण्या

पोट खूपच वाढलंय, वजन कमी होतच नाहीये? घरातल्या घरात हे ५ व्यायाम करा, फिट अँड स्लिम राहाल

पोट खूपच वाढलंय, वजन कमी होतच नाहीये?

घरातल्या घरात हे ५ व्यायाम करा, फिट अँड स्लिम

राहाल..... 


पोटाची चरबी नकोशी झालीये, तसेच वजन कमी करणे, हे वाटते तितके सोपे नाही. यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतील. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार च तुमच्या पोटाची चरबी आणि वजन कमी करू शकते. 


सैल कपड्यामध्ये तुमचे पोट मोठे व बाहेर आलेले दिसते का ? जर याचे उत्तर होय असेल तर वेळीच काळजी घ्या. व ताबोडतोब व्यायाम व पौष्टिक आहार चालू करा. आताच आपल्या तब्येतीकडे आपण दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन आपण तब्येत कमी नाही करू शकत. ते रोज वाढतच जाईल त्यामुळे वेळीच सावध व्हा. आपल्या तब्येतीमुळे बरीच लोक नाराज आहेत. वेगवेगळी ड्रेस Try करता येत नाहीत याच एकच कारण आहे, ते म्हणजे आपलं सुटलेलं पॉट व वजन. 

लठ्ठपणा हि आजच्या काळाची सगळ्यात मोठी समस्या आहे. पोटाचा घेर वाढणं, वजण वाढणं हि समस्या अनेकांना जाणवत आहे. 


मी तुमच्या साठी खास ५ स्टेप घेऊन आलीये ते हि घरी बसल्या. 


वजन कमी करण्याचे उपाय : 

वजन कमी करणे हे काय सोपं नाही. यासाठी तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. नियमित व्यायाम व पौष्टिक आहार च तुम्हाला पोटाची चरबी व वाढलेलं वजन कमी करू शकते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला व्यायाम सांगणार आहोत तो जर आपण रोज केलात तर आपल्या पोटाची चरबी नक्की कम्मी होऊन आपल वजन आटोक्यात राहील याची १००% गॅरेंटी आम्ही आपल्यास देऊ. 

हा वर्कआऊट जिम मधला प्रकार आहे. या वर्कआऊट्स मुले, चांगली गोष्ट म्हणजे ते फक्त ऍब्स व्यायाम नाहीत तर, ते आपले हाडे बळकट करतात. ज्यामुळे आल्या शरीरावर असलेली अतिरिक्त चरबी बर्न होते. हे वर्कआऊट जास्त प्रमाणात जिम मध्ये केले जातात. पण आपण हे घरी देखील करू शकतो. 


१) Kettlebell goblet  sqout ( केटल बेल ) : 

व्यायामाची सुरुवात हे नेहमी वॉर्म-अप नि करावी. निदान १० मी. वॉर्म-अप करावा. केतल्बेल हा तुमच्या छातीजवळ धरा आणि सरळ उभे राहा. आता तुमचा कोर घट्ट ठेऊन, तुमचे बॅक मागे धकला. आणि अगदी समांतर खाली बस्सा. हे तुमच्या Quads ला अधिक लवचिकता देईल. २०-२० चे ३  सेट नियमित मारा. २) (Goblet lateral lunge) गॉब्लेट लॅटरल लंज : 

उंच स्ट्रेट उभे राहा आणि डंबेल तुमच्या छाती पर्यंत धरा. आपला पाय सरळ करून एक पायावर जोर देऊन खाली बसा. तुमची टाच घट्ट जमिनीवर टेकवा. तुमचे बॅक मागे पुश करा. प्रत्येक पायाने १० चे ३ सेट करा.


 

३) (Landmine meadows row) लॅन्डमाईन मिडोज रो : 

लॅन्डमाईन मिडोज रोसाठी एक बारबेल जवळ घ्या. सरळ उभे राहा तुमची छाती उंच, कोर घट्ट ठेवा आणि तुमच्या नितंबाना पुढे टेकवा. आपल्या गुडघ्याला ओव्हरहँड ग्रीप ने व आपल्या हाताने बारबेलचा शेवट चा भाग पकडा. परत आपल्या नितंबाच्या दिशेने आणा. त्यावेळीस आपला हात पूर्णपणे सरळ ठेवा. 


४) (Dambel push press)  डंबेल पुश प्रेस :

डंबेल ची एक जोडी घ्या. साधारण पहिल्यावेळेस ५ kg  चा असावा. खांद्यांच्या उंचीवर डंबेल धरा. तुमचे तळवे एकमेकांसमोर असले पाहिजेत. तुमचा गाभा घट्ट ठेवा. डोक्यावर वजन येईल अश्या पोजिशन मध्ये धरा आणि सरळ उभे राहा. अशा प्रकारे याचे १० चे ३ सेट करा. ५) ( Bench garhammer raise) बेंच गार्हामर राइज : 

सपाट बाकावर तुम्ही बसा. आपले हात घट्ट धरून ठेवावा. आपले गुडघे ९० अंश वर वाकवा व चेहऱ्याकडे ओढा. एकदा हे पूर्ण झाल्यानंतर , मागील स्थिती कडे परत या. १० ते २० चे ४ सेट करा. 


ह्या व्यायामाचा कोणताही त्रास आपल्याला होणार नाही यांची काळजी घ्या. जपून व्यायाम करा. नियमित करा. असा व्यायाम रोज केल्यास आपली तब्येत व belly fat  नक्कीच कमी होईल.  

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

धनत्रयोदशी दिवशी धने का खरेदी करावे ?