जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

देशातील नैसर्गिक आश्चर्य
आपल्या
देशात
निसर्गाची
सर्व
रूपे
पाहायला
मिळतात.
इथे
वाळवंट
हि
आहे
आणि
चेरापुंजीसारखी सर्वाधिक पावसाची ठिकाणेही आहेत. इथे समुद्रही आहे आणि हिमवृष्टीची ठिकाणेही आहेत. पर्वत, नद्या, जंगले, धबधबे व प्रचंड जैवविविधता असलेला आपला भारत देश आहे. 'विविधतेतून एकता' हे आपल्या देशाचे सूत्र भाषा, चालीरीती, धर्म याबरोबरच हवामानाचे व निसर्गाचे वैविध्यही साधणारे आहे. देशातील काही नैसर्गिक आश्चर्य हि आपल्याला थक्क करीत असतात. अशाच काही नैसर्गिक आश्चर्यांची हि माहिती बघूया.......
मजुली बेटे :
आसाममध्ये
ब्रम्हपुत्रा नदीतील मजुली बेटे हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे. तेथील वनस्पती व पशु-पक्षांची विविधता प्रसिद्ध आहे. याठिकाणी लुप्तप्राय झालेल्या अनेक प्रजातींचे जीवही आढळतात. आसामची राजधानी गुवाहाटीपासून दोनशे किलोमीटर वर हे बेट आहे.
व्हॅली ऑफ फलोव्वर्स :
उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात असलेली हि फुलांची दरी जगप्रसिद्ध आहे. या राष्ट्रीय उद्यानात अनेक प्रकारची फुलझाडे नैसर्गिकरीत्याच अस्तित्वात आहेत. विशेषतः येथे ऑक्रीडच्या अनेक प्रजाती इथे पाहायला मिळतील. ब्रिटिश काळात काही गिर्यारोहकांना रस्ता चुकल्यामुळे अपघातानेच या दरीचा शोध लागला व तिची माहिती जगासमोर आले. अर्थात त्यापूर्वी स्थानिक लोक, साधू-योगी याना हि दरी माहिती होती.
द
ब्लु माऊंटन :
मिझोराममध्ये हा सुंदर निळा पर्वत आहे. समुद्रापासून २१५७ फूट उंचीवर असलेला हा पर्वत 'फौंगपूइ' या नावानेही ओळखला जातो. लुशाई सरोवराजवळील या पर्वताचे सायंकाळचे वहिली दिसणारे सुंदर निळसर रूप पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी जातात.
लोकटक सरोवर :
मणिपूरमधील
या
सरोवराला
'फ्लोटिंग लेक' असे म्हणतात. त्यामध्ये वनस्पती व मातीपासून बनलेली छोटो छोटी तरंगती बेटं आहेत. हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. जगातील एकमेव तरंगते नसशनल पार्क ( कैबुल लामजाओ नसशनल पार्क ) याच ठिकाणी आहे.
मार्बल रॉक्स :
मध्य
प्रदेशात
जबलपूरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीकाठी भेडाघाट आहे. याठिकाणी उंच पर्वत आणि सुंदर धबधबे आहेत. भेडाघाटच्या तीन किलोमीटरच्या परिघात संगमरवरी दगडांचे सुंदर कडे आहेत.
मुळ्यांचे पूल :
मेघालयात
चेरापुंजीमध्ये जिवंत झाडांच्या मुळ्यांपासून बनवलेले पूल आहेत. त्यांना 'ड्ब्ब्ल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज' असे म्हणतात. फिक्स इलॅस्टिका नावाच्या वृक्षांच्या मुळ्यांपासून हे पूल बनवले जातात. ते अतिशय मजबुती असतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा