वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल

'एमपीएससी' हाच
'प्लॅन बी' हवाच
'एमपीएससी' चे मायाजाल
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात 'एमपीएससी' ची परीक्षा दरवर्षी लाखो विध्यार्थी देत असल्याने सध्या नोकऱ्यांसाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. केवळ कला शाखा च नाहीतर, अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्कीयचे उचशिक्षण घेतलेल्या विध्यार्थ्यांनि स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारला आहे, अश्या परिस्थिती स्पर्धेमुळे येणाऱ्या अपयशामुळे काही जण आत्महत्येच्या मार्गावर चाले आहेत. अश्या परिस्थितीत विध्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षा जरूर द्या,.... पण 'एमपीएससी' हा 'बी प्लॅन' ठेवण्याची आणि पदवी शिक्षन घेतलेल्या क्षेत्रात कॅरिअर करण्याची गरज झाली आहे.
तज्ज्ञानी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा
परीक्षांच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळत असल्यामुळे आणि तशा प्रकारची सहजी
खासगी क्षेत्रात उपलब्ध नसल्यामुळे उच शिक्षित तरुण नोकरीच्या आशेने स्पर्धा
परीक्षांकडून वळत आहेत. त्यामुळे पुण्यात एक लाखाच्या आसपास, तर
राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास सहा ते
सात लाखांवर गेली आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीच्या संधी या एक
हजारात देखील उपलब्ध नाहीत. त्यातदेखील जागा उपलब्ध झाल्या तर परीक्षा वेळेत होत
नाही. झालीच तर निकाल वेळेत लागत नाही आणि लागलाच निकाल लवकर तर वर्षे दोन वर्षे
नियुक्ती मिळत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थी त्रासग्रस्त झाले असून, काही
तरुण टोकाचे पाऊल उचलत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा