सुटलेलं पोट अगदी महिन्याभरात कमी करणारे डाएट

सुटलेलं पोट अगदी महिन्याभरात कमी करणारे डाएट 

गृहिणींना घरकामातून फारसा स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी पूर्ण करताना त्यांची कसरत होत आहे. यामुळे त्यांचे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत. वेळोवेळी न खाणे, अरबटचरबट  खाणे, तसेच अतिप्रमाणात फास्ट फूड, जंकफूड आणि तेलकट पदार्थ खाणे यामुळे गृहिणींना वाढत्या वजनाच्या समस्येला सामोरे जावे लागते. घरकामाचा नादात व्यायामासाठी  वेळ काढणे कठीण जाते. दैनंदिन कामामुळे येणाऱ्या थकव्यामुळे महिलांना स्वतःच्या  तब्येतीकडे लक्ष देणे जमत नाही. या अश्या समस्यांचा आपल्याकडे उपाय आहे. 


यावर सगळ्यात महत्वाचं डाएट करण गरजेचं आहे तसेच स्वतःसाठी वेळ काढणं देखील गरजेचं आहे. 

डाएट केल्यास महिला वेगवान पद्धतीने सुटलेले पोट आणि वजन निम्मी करू शकतात. सुटलेलं पोट अगदी महिन्याभरात कमी करणारे डाएट:१) मिक्स्ड नटस  : सकाळी सातच्या सुमारास काजू, बदाम, अक्रोड, असा सुकामेवा  मर्यादित प्रमाणात खा. 

यातून शरीराला पोषक असे घटक मिळतात. 


२) नाश्ता : सकाळी ८ / ९ च्या दरम्यान आरोग्यदायी नाश्ता करा. कोणत्याही कारणास्तव नाश्ता करणं टाळू नका. नाश्ता मम्हणून पोहे,  उपीट,ओट्स, व्हेज सँडविच खाऊ शकतात. 


३)  सकाळी अकरा : नाश्ता केल्यानंतर किमान एक तासानंतर ग्रीन टी, लिंबू पाणी प्या. नंतर अर्धी वाटी मोड आलेले कच्ची सॅलेड म्हणून खा. पाँईट देखील खाऊ शकतात.

४) दुपारचे जेवण : दुपारी १ वाजता आपण जेवण करू शकतो. जेवण पौष्टिक असलेलं उत्तम. गव्हाची  चपाती, नाचणीची भाकरी, खाऊ शकतात. ताजी भाजी, तेल कमी असलेल्या भाज्यांचा समावेश असावा, तसेच हिरव्या पालेभाज्या असाव्यात. डाळीची आमटी, अश्या प्रकारचं जेवण करावं. असे पदार्थ खाल्याने भूक भागते. 

(दुपारच्या जेवणानंतर शतपावली करायला विसरू नका) 

५) ग्रीन टी : ४ नंतर एक कप ग्रीन टी प्या. 

(चहा पिन पूर्ण पने बंद करा. चहा पिल्याने जेवणाचं तालमील बसत नाही  भूक नाहीशी होते त्याचा शरीरावर खूप परिणाम होतो.) 

६) रात्रीचे जेवण : संध्याकाळी कमी प्रमाणात जेवण करा. ८/९ च्या आसपास जेवण करून घ्या. व्हेजिटेबल ब्राउन राईस आणि त्या सोबत सॅलेड खा. अथवा खिचडी असे खा. 


असे डाएट न चुकता एक महिना वेवस्थित केले तर आपले वजन नक्कीच एका महिन्यात कमी 

येते. सुटलेले पॉट कमी होते. आपला फिटनेस नीट राहतो. 

आरोग्यदायी लाभ होतो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली विजेता कोल्हापूरची महिला, 'कौन बनेगा करोड़पति'

पृथ्वीवरच अवतरणार चंद्र! जेव्हा, आराम करा अन राहा.....

कॉमेडी चा राजा (King) राजू श्रीवास्तव यांचे दुःखद निधन