वेड तुझे ... चे नवे व्हर्जन... काही नवे बद्दल

यश मिळण्यासाठी गाढवाच्या
या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, नक्की काय सांगते चाणक्य नीती...
चाणक्य मंत्र : आचार्य
चाणक्य यांनी आपल्या नीती शास्त्रात जीवनातील अनेक गोष्टींवर त्यांचं मत आणि
स्पष्टीकरण मांडले आहेत. त्यामुळे आज ही लोक त्यांच्यावर चर्चा करतात तसेच
त्यांच्या शास्त्रनुसार चालतात. आचार्य चाणक्य यांना राजकारण तसेच नीतिमत्ता यांची
चांगलीच पारख आहे. कधी आयुष्यातल्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकवून जातात हे
आपल्याला कळत देखील नाही. अश्या वेळी आपल्याला नक्कीच कायतर शिकायला मिळते. आचार्य
चाणक्य यांच्या नितीनुसर,
एखाद्या व्यक्तीने
गाढवाकडून शिकावे असे ते म्हणत असत. त्यामुळे जीवनात यश मिळू शकते. आचार्य चाणक्य
यांच्या नीती नुसार गाढवाकडून ३ गोष्टी शिकाव्यात.
१) आळस सोडून द्या : आचार्य
चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही खास असे असतेच. गाढवामद्ये अक
गुण आहे, तो म्हणजे त्याला आळस नसतो.
कितीही थकलेले गाढव असूनही गाढव ओझे वाहून घेवून जातो. तसेच हुशार व्यक्ती देखील
आळस झटकून आपले ध्येय प्राप्त करू शकतो.
२) आयुष्यात समाधानी रहा :
समाधान हे फार महत्वाचे आहे आपल्या आयुष्यात. आचार्य चाणक्य यांच्या नीती नुसार
गाढव जीवनातील प्रत्येक गोष्टीत समाधानी असतो. त्याच पद्धतीने ज्ञानी माणसाने सुधा
प्रत्येक गोष्टीत समाधानी असावे. मेहनत आणि प्रामाणिक काम करत रहा यश एक दिवस
नक्कीच मिळेल.
३) काम करत राहणं : जसे
गाढव प्रत्येक परिस्थितीत आपले काम करत असते. म्हणजेच थंडी असो किंवा उष्णतेचा
अजिबात परिणाम होत नाही. तसेच माणसांनी हवामानाची चिंता न करता नेहमी आपले काम करत
राहावे. हवामानाच्या नियमानुसार माणूस चाला तर तो आपले ध्येय गमावून बसतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा