जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

The formula of life The formula of life : रोबोट सारखं सतत राबूनही मनासारखं घडत नाही. जीवनात यश मिळते की नाही, हाच विचार कायमचा धुडगूस घालतोय. सुवर्णाक्षणाच्या नेनिवेन वर्तमानाला हायस केलय. पण वर्षाच्या वर्ष उलटत असूनही आपण मात्र होतो तिथेच आहोत. नजरेसमोर केवळ काळोख दिसतोय. अंध:कारणं हृदय धडधडतय. अशावेळी मनातल्या विचारांच्या गोंधळाला बाजूला सारून पॉज घ्यायलाच हवा. कोण जाणे उत्तर काळाच्या उदरात दडलेले असतील. काही प्रश्नांवर वेळ हाच उपास अस. जीवनात असे प्रसंग येतात जे सोडवण्याची क्षमता आपल्यात नसते. ज्या गोष्टी मनुष्याच्या नियंत्रणाबाहेर असतात त्यावर कथ्थ्या कूट करण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. याचा अर्थ, तुम्ही स्वस्थ बसावं असा होत नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की, सर्व मार्ग बंद झालेत, खरं तर, तेव्हाच तुमच्या उज्वल भविष्यासाठी अनेक मार्ग खुलायला लागलेले असतात. प्रत्यक्षात ते आपल्या सामान्य नजरेने दिसत नाहीत. अस्वस्थ आणि गोंधळलेल मन तर तिकडे लक्ष देऊ शकत नाही. अशावेळी शांततेचा पॉज गरजेचा असतो. सर्वप्रथम अंतर्मनाला शांत करणे गरजेचे असतं आणि ते पॉज घेतल्याशिवाय शक्य नसतं. बाहेरचं